अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २७ मार्च २०२५:-अकोला शहरातील कृषि नगर परिसरात अवैध देशी दारू साठा बाळगणाऱ्या दोघांवर SDPO पथकाने धडक कारवाई केली. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील या मोहिमेत निखिल चराटे आणि अक्षय इंगळे, दोघेही राहणार कृषि नगर, अकोला, यांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या घरावर छापा टाकून पंचासमक्ष तपासणी केली, त्यात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी 688 बॉटल्स टॅंगो देशी दारू (प्रत्येकी 180ml) जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत 48,160 रुपये आहे. तसेच, MH 30 BN 8283 क्रमांकाची मोटारसायकल, अंदाजे 60,000 रुपये किंमतीची, पोलिसांनी ताब्यात घेतली.
एकूण जप्त मुद्देमाल – ₹1,08,160/
या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,08,160/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(e) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस प्रशासनाची कडक भूमिका!
अवैध दारू विक्रीमुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, तसेच सार्वजनिक आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. सिव्हिल लाईन पोलीस आणि SDPO पथकाने तातडीने ही कारवाई करून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांचा इशारा – अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील!
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. अशा कृत्यांना थारा दिला जाणार नाही, आणि अवैध मद्य व्यवसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.