WhatsApp


तुफान राडा: जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ, पोलिसांवरही हल्ला

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १७ मार्च २०२५:-शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेत संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ केली असून, पोलिसांनाही लक्ष केले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र तरीही तणाव कायम आहे.

काय घडले नेमके?

शिवाजी चौक परिसरात दोन गट आमनेसामने येताच परिस्थिती बिघडली. अचानक सुरू झालेल्या वादातून जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता संतप्त जमावाने जाळपोळही सुरू केली. या गोंधळात काही पोलिस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांचा प्रयत्न आणि शांततेचं आवाहन

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नियंत्रित बळाचा वापर केला. जमावाला शांत करण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. तरीही परिस्थिती पूर्णतः निवळलेली नाही. नागपूर शहर पोलिस उपायुक्त राहुल मातळीकर यांनी सांगितले की, “नागपूर हे सलोख्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. झालेल्या घटनांचा विसर पाडून दोन्ही गटांनी शांतता राखावी.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शांततेचं आवाहन

या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचं आणि संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. “कोणत्याही अफवांना बळी न पडता नागपूरकरांनी सामाजिक सलोखा राखावा,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सध्याची परिस्थिती

पोलिसांनी परिसरात अतिरिक्त फौज तैनात केली असून, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कडक पावलं उचलत आहेत. दरम्यान, नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आणि सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नागपूरकरांनी संयम बाळगावा आणि शहरातील शांतता टिकवण्यासाठी सहकार्य करावं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!