WhatsApp

अकोल्यात एसटी बसचा थरारा:-रिव्हर्स घेताना एसटी बस पुलाखाली गेली; सुदैवाने जीवितहानी नाही

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २७ फेब्रुवारी २०२५:-तेल्हारा— वांगेश्वरकडे जाणारी एम एच 40 ए क्यू 6409 क्रमांकाची एसटी बस वाकोडी फाट्यावर रिव्हर्स घेत असताना पुलाखाली गेल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.



समोर वाहन असल्याने बसचालकाने रिव्हर्स घेताना अंदाज चुकला, त्यामुळे बसची मागील दोन चाके थेट पुलाखाली गेली. अचानक बस एका बाजूला झुकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरडाओरड सुरू होताच प्रवाशांना तात्काळ बसच्या बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच एसटी आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त बस क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने बसचालकांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Watch Ad

या घटनेने वाहनचालकांच्या सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चालकांनी अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Leave a Comment