WhatsApp


Murtijapur :-गळफास घेत ५८ वर्षीय इसमाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ फेब्रुवारी २०२५:-मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथे एका ५८ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पुंजाजी धारपवार (वय ५८) यांनी आपल्या राहत्या घरात लाकडी नाटीला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
या घटनेबाबत श्रीकृष्ण रमेश धारपवार (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मण धारपवार हे त्यांच्या शेजारी आपल्या कुटुंबासोबत राहत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, प्राथमिक चौकशीत आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्यात १९४ बीएनएस अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय खंडारे करत आहेत. पोलिस विविध अंगाने तपास करून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!