अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी सुरज देशमुख दिनांक २३ फेब्रुवारी २०२५:- रोजी स्वच्छतेचे जनक आणि थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची १४९ वी जयंती त्यांच्या जन्मगाव शेंडगाव, ता. अंजनगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त समाजाच्या ऐक्याचा संदेश देण्यासाठी आणि विवाह योग्य युवक-युवतींच्या नातेसंबंध जुळवण्यासाठी डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र आणि जानोरकर परिवार, शेंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
शेंडगाव येथे नव्याने उभारलेल्या शासकीय इमारतीत हा परिचय मेळावा पार पडला. सर्वप्रथम मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची औपचारिक सुरुवात झाली. डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्रचे मार्गदर्शक श्री. विश्वनाथ राऊत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून बाबांच्या विचारांचे महत्त्व आणि समाजाच्या ऐक्याची गरज अधोरेखित केली.
या मेळाव्यात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा विशेष सत्कार आयोजकांकडून करण्यात आला. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा या विविध जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेंडगाव येथे प्रथमच असा परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याचे डेबुजी युथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल वरणकार यांनी सांगितले.
मेळाव्यात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव नितेश दादा वानखडे, बुद्धभूषण गवई आणि जगदीश कांबे यांनी विशेष उपस्थिती लावली. आयोजकांनी त्यांचा देखील सन्मान केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या वधू-वरांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून मंचावर आपला परिचय दिला. या वेळी सभागृह समाजबांधवांनी गजबजून गेले होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नैनेश माहुलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डेबुजी युथ ब्रिगेडचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल कडूकार यांनी केले. आयोजकांनी पुढील जयंतीदिनी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डेबुजी युथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार, मार्गदर्शक विश्वनाथ राऊत सर, अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल कडूकार, गाडगेबाबांचे वंशज प्रवीण जानोरकर आणि नितीन जानोरकर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज मदनकर, सुषमा अमृतकर (अचलपूर), गजानन सोळंके (सरपंच, शेंडगाव), स्वप्निल साबळे (उपसरपंच, शेंडगाव), अरुण शिवाने व पक्षमित्र यांची मोलाची भूमिका राहिली.
याशिवाय राजेश शेवाने, रमेश सांबस्कर, विमल खंडारे, अवधूत तिडके, पत्रकार मंगेश बोरकर, सुनील जवंजाळकर, नरेंद्र जानोरकर, अनंत जानोरकर, पंकज ठाकरे, गोपाल रामेकर, सुधीर सामतकर, अतुल बोरेकर, राम डायलकर, सतीश शृंगारे, गौरव जवळकर, भूषण सरदार, मनोज दख्खनकर, विनोद माहुलकर, अक्षय मोहोड, पंकज पवार, सचिन शामतकर, अंकुश शिरसकर, विशाल कौलकर, सौरभ वरणकर, गणेश कुसटकर, संतोष रामेकर, दीपक शेवाने, प्रशांत मानकर, प्रतीक हीरुळकर, शुभम माहुलकर, विजय सोनोने, अक्षय सेवाने, गोपीनाथ मुंडोकार आणि पंकज दुदंडे यांनी अथक परिश्रम घेतले.
संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाज एकत्र येण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. या परिचय मेळाव्यामुळे अनेक कुटुंबांना विवाहासाठी योग्य जोड्या निवडण्याची संधी मिळाली. आयोजकांच्या पुढील सामूहिक विवाह सोहळ्याच्या संकल्पामुळे समाजसेवेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.