अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २० फेब्रुवारी २०२५:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चौवाशिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, राजे छत्रपती ब्लड डोनर ग्रुप, आणि अकोला नाका मित्र मंडळ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शेकडो युवक-युवतींनी रक्तदान करून शिवरायांना आगळीवेगळी मानवंदना दिली.

या शिबिराचे उद्घाटन अति. जिल्हाधिकारी घुगे साहेब, तहसीलदार पळसकर साहेब, तसेच आपत्ती व्यवस्थापक प्रमुख शाहू भगत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव सर, मनीष डांगे, डॉ. सिद्धार्थ देवळे, डॉ. तुषार गायकवाड, डॉ. माधव हिवाळे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
शिवसेना नेत्या आणि विधान परिषद आमदार भावनाताई गवळी, तसेच वाशिम विधानसभेचे आमदार श्यामभाऊ खोडे यांनीही शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी कृष्णा चौधरी, राजू अग्रवाल, भागवत सावके, ओमप्रकाश फड, प्रवीण पट्टेबहादूर, मनीष मंत्री, नामदेवराव हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढी, वाशिम येथील संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केले. सार्वजनिक शिवजयंती समिती सचिव गजानन भोयर, कोषाध्यक्ष नारायणराव काळबांडे, जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव भागवतराव महाले, आणि प्रवीण गोटे यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

या शिबिरात शेकडो युवक-युवतींनी रक्तदान करून समाजात एक सकारात्मक संदेश दिला. शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होत समाजसेवेच्या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली.
हे रक्तदान शिबिर केवळ आरोग्यासाठी नव्हे, तर शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरले. महाराजांनी दिलेला स्वराज्य आणि समाजसेवेचा मंत्र या युवा पिढीने कृतीतून दाखवून दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून, दरवर्षी अशाच प्रकारे समाजसेवा करण्याचा संकल्प केला. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक केले आणि भविष्यात अशा अधिक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.