अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक २ फेब्रुवारी २०२५:- तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत शिवाजीनगर अंतर्गत असलेल्या मालठाणा बुद्रुक येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरो (RO) प्लांट बसविण्यात आला. या अत्याधुनिक आरो प्लांटचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. गायत्री नितीनकुमार चिम यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनमोहन व्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते स्वतः होते. याशिवाय माजी सरपंच मोहम्मद युसुफ, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ. धामोडे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता मालवे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरओ प्लांट उभारणीमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा
ग्रामस्थांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने मालठाणा बुद्रुक येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरो प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमुळे गावकऱ्यांना आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मोठा निर्णय असल्याचे सरपंच सौ. गायत्री चिम यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, शासनाच्या मदतीने हा आरओ प्लांट उभारण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद
या उद्घाटन सोहळ्यानंतर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, “गेल्या काही वर्षांपासून शुद्ध पाण्याची गरज होती. हा प्लांट आमच्यासाठी वरदान ठरणार आहे. गावातील महिलांनीही यावर आनंद व्यक्त करताना सांगितले की, या उपक्रमामुळे त्यांना घरच्या घरीच शुद्ध पाणी मिळणार आहे आणि पाण्यासाठी दूर जावे लागणार नाही.
मुख्य पाहुण्यांचे विचार
यागावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे अमलात आणाव्यात,:- कार्यक्रमात मुख्य पाहुणे डॉ. मनमोहन व्यास
गावातील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांनी सहकार्य करावे आणि आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी वापरण्यावर भर द्यावा :-माजी सरपंच मोहम्मद युसुफ
या आरो प्लांटमुळे गावातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्वाची समस्या सुटणार आहे.:- ग्रामपंचायत सदस्य सुनिता मालवे