अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ४ जानेवारी २०२५ :- महायुतीमध्ये हवी ती मंत्रीपदे मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच शर्यत आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने त्याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. सध्या महायुतीतील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरात पडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नेमकं या दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर येत आहे.
राज्यातील निवडणूक आटोपली आणि अकोला जिल्ह्यात भाजपने अकोला पूर्व, मूर्तिजापूर, आणी आकोट अशा चार जागा आपल्या पदरात पाडल्या असल्या तरी मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यात अकोला जिल्ह्याला अपयश आले आहे आता त्यात परत बाहेरील जिल्ह्याचे पालकमंत्री अकोलेकरना मिळणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लागणार असल्याची संभाव्य यादीतून दिसून येत आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या बदलांची चर्चा जोरात असून,
माणिकराव कोकाटे यांच्या नावाची अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या नेत्तृत्व कौशल्यामुळे ते या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर भाऊसाहेब फुंडकर यांच्या वारशाचा पुढील धागा म्हणजे त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर. आकाश यांनी २०१४, २०१९, आणि २०२४च्या निवडणुकांमध्ये सलग तीन विजय मिळवत खामगाव मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकवला. यावेळी त्यांनी २५,६२९ मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढला. असून त्यांचे नाव देखील अकोला जिल्ह्याच्या पालक मंत्री पदासाठी चर्चेत असून अकोलेकरांची देखील आकाश फुंडकर याच्या नावाला पहिली पसंती असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
अकोल्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, लवकरच अधिकृत निर्णयाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर? तुमच्या जिल्ह्यात कोणाला पद-
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे / आकाश फुंडकर यांचा देखील दावा आहे
.अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – एकनाथ शिंदे
गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम