ANN न्यूज नेटवर्क ब्यूरो अकोला,दिनांक २९ डिसेंबर २०२४ : पातूर : शेतीच्या वादातून इसमास Attack by a coyote कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज पातूर शहरात घडली आहे.
पातूर शहरातील भंडारज शेत शिवारात आज दि.29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान सुरेश बगळेकर रा.शिवाजीनगर,शनिवार पुरा,पातूर व ऋतिक शिवहरी परमाळे रा.बाळापूर वेस,पातूर यांच्यात शेतीच्या धुऱ्यावरून बाचाबाची झाली असता सदर वाद विकोपास गेल्याने रागाच्या भरात ऋतिक परमाळे याने सुरेश बगळेकर (वय अंदाजे 55) यांच्या पाठीवर Attack by a coyote कोयत्याचा जबरदस्त वार करून गंभीर जखमी केले आहे. दरम्यान स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणून प्रथमोपचार करून 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील इलाजासाठी सर्वोपचार रुग्णालय,अकोला येथे हलविण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सदर घटनेतील आरोपी ऋतिक शिवहरी परमाळे (वय अंदाजे 23) यास अटक केली केली असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.