WhatsApp


Maharashtra Band 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का?

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २४ ऑगस्ट २०२४ :- Maharashtra Band 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का? या दिवशी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ‘बंद’ची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेत दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ जाहीर केला आहे. तसेच या घोषणेनंतर राज्यातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, 24 ऑगस्ट रोजी शाळा, महाविद्यालये, बँका बंद राहणार का?

Maharashtra Band महाराष्ट्र बंदला कोणाचं समर्थन?
MVA मित्रपक्ष काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनायुबीटी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP या बंदला पाठिंबा देत आहेत. तसेच शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील लोक नाराज असून आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर घटनेच्या निषेधार्थ MVA 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन देणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे सरकार असंवैधानिक आहे. महाराष्ट्र बंद आवश्यक आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, बदलापूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही 24 ऑगस्टला बंदचे आवाहन दिले आहे.

Maharashtra Band 24 ऑगस्टला शाळा-कॉलेज बंद राहणार का?
तसेच याबद्दल सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता कमी आहे. पण, ज्या संस्था शनिवारी बंद असतात, त्या बंदच राहतील.

Maharashtra Band अकोला जिल्ह्यात देखील बंद पाळण्याचे आवाहन
बदलापूर नंतर दुसरी विकृतीची घटना ही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडली येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणे सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आज देखील ह्याच विकृतीची घटना अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत घडली आल्याने पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे या विकृतीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदच्या हाके मध्ये अकोल्यातील समस्त जनतेने सहभाग घेवून आप आपली प्रतिष्ठाने व्यवसाय शाळा कॉलेज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बाळापूर चे आमदार नितीन बाप्पू देशमुख यांनी अकोला न्यूज नेटवर्क शी बोलताना दिले.

Maharashtra Band बँका बंद राहणार का?
24 ऑगस्ट शनिवार रोजी देशभरातील बँका बंद राहतील, कारण हा महिन्याचा चौथा शनिवार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, बँका दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार, राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बंद राहतात.

Leave a Comment

error: Content is protected !!