WhatsApp

Crop insurance शासन म्हणतो एक रुपयात पीक विमा, मात्र केंद्रावर शेतकऱ्यांचे खुलेआम लूट, प्रती अर्ज १०० ते १५० रुपयांनी लूट

Share

अकोला न्यूज नेटवर्क डेक्स दिनांक २२ जुलै २०२४ गणेश बुटे अकोला :- Crop insurance खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. एक रुपया भरून बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, सेतू केंद्र यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. परंतु, अकोट तालुक्यातील काही सीएससी, ऑनलाइन सेंटरकडून फॉर्म भरण्याचा खर्च म्हणून १०० ते १२० रुपये घेतले जात आहेत..



सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सीएससी केंद्रांतून शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज करायला सांगितले आहे. परंतु, काही केंद्रचालकच शेतकऱ्यांकडून Crop insurance पीकविम्याच्या नावाखाली अर्ज भरण्यासाठी जादा रुपये आकारून आर्थिक लूट करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

महसूल व कृषी विभागाचा ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेचा गाव पातळीवर जोरदार गाजावाजा सुरू आहे. यासाठी सीएससी केंद्राला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये मिळत असून सुधा Crop insurance पीकविमा भरण्यासाठी काही सीएससी केंद्रचालक लाभार्थी कडून १०० ते १५० रुपये घेत असून, शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा प्रकार सुरू आहे.

Crop insurance सेतू केंद्रावर शेतकरी ,विद्यार्थ्यांची खुलेआम लूट



Watch Ad

महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार आणि सेतू केंद्राच्या दर्शनी भागात सेवा शुल्काचे दरफलक लावण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले होते. मात्र, बऱ्याचशा केंद्रांवर दरपत्रक लावलेले नाही. शासनाच्या विविध योजना तसेच शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार आणि सेतू केंद्रातून रहिवासी, उत्पन्न, डोमिसाइल, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र अशा प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. अवघ्या ३५ रुपयांच्या प्रमाणपत्रासाठी कुठे २०० तर कुठे ५०० रुपये आकारले जाता आहेत.

Leave a Comment