WhatsApp


Akola police अकोला पोलिसांना मिळालं ‘वज्र’! दंगल नियंत्रणासाठी अत्याधुनिक ‘वज्र’ पोलीस दलात दाखल

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १२ जुलै: Akola police संवेदनशील जिल्ह्यांच्या यादीत गणले जाणारे अकोला शहर आता शांततेच्या मार्गावर निश्चितपणे चालू लागले आहे. या शांततेचे रक्षक म्हणजे इतर कोणी नसून आपले अकोला पोलीस दल.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल सदैव सतर्क असते आणि यासाठी विविध उपाययोजना राबवत असते. Akola police दंगल नियंत्रण योजना, मॉक ड्रिल, रूट मार्च यांसारख्या उपाययोजनांद्वारे पोलीस दल शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आजच्या अत्याधुनिक युगात पोलीस विभागातही वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. याच बदलाचा एक भाग म्हणून, अकोला जिल्ह्याच्या संवेदनशीलतेचा विचार करून Akola polis पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. या मागणीला मान देऊन, प्रशासनाने डी.पी.डी.सी. फंडातून

सदरचे दंगल नियंत्रण ‘वज्र’ वाहन पोलीस विभागाच्या ताब्यात दिले आहे. आज दिनांक १२/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. या वाहनाचे उद्घाटन Akola police पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भव्य समारंभात करण्यात आले.

Akola police हे ‘वज्र’ वाहन दंगल नियंत्रणासाठी अत्याधुनिक साधनांनी युक्त आहे. दंगलीमध्ये अनियंत्रित जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. यात जनरेटर, लाईटिंग व्यवस्था, फ्लॅश लाईट, सायरन इत्यादींचा समावेश आहे.

पुढील काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या वाहनांचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल, असे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वज्र’ वाहनाच्या आगमनाने अकोला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल यात शंका नाही. नागरिकांनीही शांतता राखण्यास सहकार्य करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!