WhatsApp


‘खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून…’; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट How long can you live without food and water

Share

How long can you live without food and water मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या आमरण उपोषणाचा नेमका काय परिणाम होत आहे यासंदर्भातील एका डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्थात ही पोस्ट मनोज जरांगे-पाटील समर्थकांची चिंता वाढवणारी असली तरी एवढ्या दिवस अन्नशिवाय राहिल्याने शरीरामध्ये नेमके काय बदल होतात हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

How long can you live without food and water: जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो माणूस?

How long can you live without food and water : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे. कालच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यात अनेक नेत्यांची घरे आणि त्यांची कार्यालये मराठा समाजाकडून जाळण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्याभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच यावेळी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून करण्यात आलं आहे. जाळपोळीच्या आणि दगडफेकीचा वाढत्या घटना लक्षात घेता एसटी महामंडळाकडून बऱ्याच जिल्ह्यांतील बसेस देखील बंद करण्यात आल्या आहेत.

मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येते आमरण उपोषण सुरू केले असून सोमवारी त्यांच्या या उपोषणाला 6 दिवस पूर्ण झाले आहेत. तर त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. उपोषण सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी पाण्याचे एक ते दोन घोट सोडले तर काहीही पिलेले नाही किंवा खाल्लेले नाहीये. (How long can a human go without food and water)

How long can you live without food and water
How long can you live without food and water

त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जागेवरून उठून बसायला देखील जमत नाहीये. जागेवरच झोपून ते तेथे उपस्थित असलेल्या पत्रकार आणि समाजबांधवांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत की माणसाने उपोषण केल्याने किंवा अन्नत्याग केल्याने त्याच्या शरीरावर याचा काय परिणाम होतो, हे या महत्वपूर्ण लेखाच्या माध्यमातून.

हे हि वाचा :- Maratha Reservation: मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार, आंदोलक हिंसक होत असल्याने घेतला निर्णय

माणूस अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो यासंदर्भात अनेक प्रकारचे संशोधन करण्यात आले आहे. How long can you live without food and water या सर्व संशोधनाच्या निष्कर्षानुसार एखादा व्यक्ती अन्न आणि पाण्याचे सेवन न करता 8 ते 21 दिवस जिवंत राहू शकतो. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. ते म्हणजे संबंधित व्यक्तीच वय किती आहे, त्याचे आरोग्य चांगले आहे का?, त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण किती आहे? या सर्व बाबींचा देखील विचार करावा लागेल.

परिणामी त्या अन्नत्याग केलेल्या व्यक्तीला नियमित करत असलेली कार्ये करताना पुरेशा कॅलरी शरीराला मिळणे आवश्यक असते. आणि या कॅलरी न मिळाल्यास त्याचा शरीरावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचं दिसून येतं. यातही दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे अन्नाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने किंवा अन्नत्याग केल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

आणि दुसरे म्हणजे पुरेसे अन्न घेऊनही शरीराला आवश्यक ते पोषक तत्वे न मिळणे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुमच्या शरीराला अन्नातून आवश्यक तेवढ्या कॅलरी मिळत नाही तेव्हा तुमचे शरीर तुमच्या स्नायूंमध्ये असलेली शक्ती वापरण्यास सुरूवात करते आणि असे होऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर मृत्यू देखील ओढवू शकतो.

तुम्ही अन्न-पाण्याशिवाय किती काळ जगू शकता याबाबत अजून तरी कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाहीये. मात्र आतापर्यंत केलेल्या संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की माणूस हा अन्न-पाण्याशिवाय जास्तीत जास्त एक आठवडाभरच जगू शकतो. मात्र याला देखील एक अपवाद आहे. जर तुम्ही अन्नाचा त्याग केला असेल आणि तुमच्या शरीराला वेळच्या वेळी पाणी मिळत असेल तर तुम्ही सहजरित्या 2 त 3 महिन्यांच्या आसपास जिवंत राहू शकता. मात्र अन्नत्याग करणे किंवा पाण्याचा त्याग करणे हे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते.

माणसाच्या बॉडीचे मास इंडेक्स किती असावे?

आपले वजन हे आपल्या आरोग्याबाबत खूप काही सांगून जाते. जर आपले वजन कमी असेल आणि बॉडी इंडेक्सचे प्रमाण हे 18.5 पेक्षा कमी असल्यास हे कुपोषित असल्याचं लक्षण मानलं जात. याचाच परिणाम म्हणजे तुमचे वजन कमी असल्यास तुमचे आयुष्य देखील कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त होणाऱ्या रोगांचा विचार केला तर अशा प्रकारच्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते तसेच त्याच्या पंचसंस्थेवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

आणि महत्वाचं म्हणजे यामुळे कर्करोगासारखे आजारही बळावू शकतात. 2018 साली एक संशोधन करण्यात आले होते. त्यामधून असे समोर आले आहे की, बॉडी मास इंडेक्स हे 18.5 पेक्षा कमी प्रमाणात असल्यास पुरुषांचे आयुष्य हे सरासरी 4 वर्षे 3 महिन्यांनी तर महिलांचे आयुष्य हे 4 वर्षे 5 महिन्यांनी कमी होऊ शकते.

अन्न न खाता माणूस…

How long can you live without food and water मुळचे लातूरचे असणारे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता वाटत असल्याचं सांगत पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या पोस्टमध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांचा आंदोनलस्थळावरील फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये डॉ. प्रकाश कोयाडे म्हणतात, “अन्न न खाता माणूस फक्त पाण्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडे जगू शकतो तर अन्न आणि पाणी दोन्ही शिवाय साधारणपणे एक आठवडा माणूस जगू शकतो.” पुढे लिहिताना डॉ. प्रकाश कोयाडे यांनी, “अगदी शंभर टक्के प्रत्येकवेळी हे असंच घडतं असं नाही तर त्या व्यक्तीचं शरीर, भौतिक परिस्थिती, मानसिक स्थिती बऱ्याच गोष्टींचा थोडाफार फरक पडतो,” असंही नमूद केलं आहे.

…की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात

How long can you live without food and water सोमवारी मनोज जरांगे-पाटील यांनी संवाद साधण्यासाठी माईक हाती घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता. या गोष्टीकडे लक्ष वेधत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी हे लक्षण बरं नाही असं म्हटलं आहे. “जरांगे पाटलांचा आज (30 ऑक्टोबर) उपोषणाचा सहावा दिवस आहे. माईक हाती धरताना त्यांचे हात थरथरत होते. हे लक्षण काही ठीक नाही,” असं डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे. “व्यक्तीचं वजन बऱ्यापैकी असेल तर अन्न न मिळाल्यामुळे आधी शरीरातील फॅट वापरलं जातं आणि शरीराला तग धरायला वेळ मिळतो. एकदा का फॅट संपलं की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात कारण शरीराकडे उर्जा मिळविण्याचा तो एकच पर्याय असतो. अशावेळी प्रतिकूल लक्षणं दिसायला लागतात जशी की, अशक्तपणा, चक्कर येणं, त्यातीलच एक म्हणजे हे हातांची थरथर,” असं या पोस्टमध्ये पुढे डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे.

अवस्था एवढी नाजूक आहे की…

“या दरम्यान तयार झालेले किटोन्स फार घातक ठरतात. खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून लिहावं लागतंय. या लक्षणांची परिणीती फार अवघड होऊ शकते. अगदी ब्लड प्रेशर कमी होणं, अवयव निकामी होणं, हृदयाची गती मंदावणं, हृदयाचा झटकासुद्धा…How long can you live without food and water माझी पुढचं काही बोलायची इच्छा नाही! एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता त्यांची अवस्था एवढी नाजूक आहे की, आत्ता…‌ अगदी या क्षणी वैद्यकीय उपचार सुरू होणं आवश्यक आहे,” असंही आपल्या पोस्टमध्ये डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे.

“जरांगे पाटील… माणूस वाचला पाहिजे… वेळ फार कमी आहे. काहीतरी निर्णय होणं आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून हे बघवत नाही,” असं म्हणत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी पोस्टचा शेवट केला आहे. How long can you live without food and water

Leave a Comment

error: Content is protected !!