WhatsApp


Ola Solo: ची नवी गाडी लाँच पहा व्हिडीओ! रायडरशिवाय धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, Ola घेऊन येत आहे जगातील पहिली ऑटोनॉमस EV

Share

Ola Solo autonomous electric scooter : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एक एप्रिल रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी ‘ओला सोलो’ या आपल्या नव्या स्कूटरबद्दल माहिती दिली होती.

ही स्कूटर आपोआप चालणार असल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओमधून दिली होती. कित्येक जणांना हा ‘एप्रिल फूल’चा जोक असल्याचं वाटलं होतं. मात्र, भाविश अग्रवाल यांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पोस्ट करत हा जोक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

भाविश (Bhavish Aggarwal) यांनी एक तारखेला एक्स पोस्ट करत म्हटलं होतं, की आधीच प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही एक नवीन प्रॉडक्ट सादर करत आहोत. ‘ओला सोलो’ (Ola Solo) ही एक पूर्णपणे ऑटोनॉमस, एआय इनेबल्ड आणि ट्रॅफिक स्मार्ट स्कूटर आहे. भारतातील अशी ही पहिलीच स्कूटर आहे. आमच्या इंजिनिअरिंग टीमने ही कल्पना सत्यात उतरवली आहे. ओला इलेक्ट्रिक आणि कृत्रिम यांनी मिळून ही स्कूटर तयार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. (Ola self balancing Scooter)

कित्येकांना वाटलं एप्रिल फूल जोक

भाविश यांच्या या व्हिडिओवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. हा नक्कीच एप्रिल फूल करण्याचा एक प्रकार असल्याचं नेटिझन्स म्हणाले. जर ही टेक्नॉलॉजी खरंच सत्यात आली, तर ओला भारतातील टॉप इलेक्ट्रिक स्कूटर मेकर बनेल असंही काही यूजर्स म्हणाले. (Ola Automatic Scooter)

Xiaomi SU7 : टेस्लाचं दुकान होणार बंद? श्याओमीने स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..
ओलाने खरंच तयार केली स्कूटर

यानंतर दुसऱ्या दिवशी भाविश यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत, हा एप्रिल फूल्स जोक नसल्याचं स्पष्ट केलं. भाविष यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं, “आम्ही काल ओला सोलो बाबत घोषणा केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कित्येकांना हा एप्रिल फूल्स जोक वाटत होता. हा व्हिडिओ नक्कीच केवळ मजेसाठी तयार करण्यात आला होता. मात्र, त्यात वापरलेलं तंत्रज्ञान खरोखरच अस्तित्वात आहे.” (Ola Scooter Viral Video)

“आमच्या इंजिनिअरिंग टीमने कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर ‘ओला सोलो’चा प्रोटोटाईप तयार केला आहे. भविष्यात वाहनं आणि वाहतूक कशी असेल याची ही एक झलक आहे. हे ऑटोनॉमस आणि सेल्फ-बॅलन्सिंग तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यासाठी आमची टीम काम करत आहे.” असंही भाविश यांनी स्पष्ट केलं.

एकूणच, ओलाने खरोखरच आपोआप चालणाऱ्या आणि स्वतःच स्वतःला बॅलन्स करणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रोटोटाईप तयार केला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक विकसित आणि सुरक्षित झाल्यास याचं मोठ्या स्तरावर उत्पादन घेण्याचा ओलाचा विचार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!