WhatsApp


Loksabha Election 2024 रेल्वे स्टेशन तसेच जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आचारसंहितेचे उल्लंघन! निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष? वंचित बहुजन आघाडीची सीवीजिल वरून तक्रार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १ एप्रिल :- Loksabha Election 2024 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आचारसंहिता लागू असूनही त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अकोला रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या शोभेच्या रेल्वे इंजिनवरील नावाची पाटी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या पाटीवर माजी मंत्र्यांचे नाव लिहिलेले आहे.

अकोला शहरातील रेल्वे स्थानकावर लावलेल्या शोभेच्या रेल्वे इंजिनवरील पाटीवर आजीमाजी मंत्र्यांचे नाव लिहिल्याप्रकरणी निवडणूक विभागाकडून कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. निवडणूक आचारसंहितेचे हे उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून यावर गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर निवडणूक आयोगाचा बारीक लक्ष असतो.

परंतु अकोल्यात रेल्वे स्थानकावरील जुनी संस्मरणीय रेल्वे इंजिनवर असलेल्या पाटीवर मंत्र्यांची नावे लिहिली गेल्याने याचा स्पष्ट भंग केला आहे. ही घटना सर्वसामान्य रेल्वेप्रवाशांच्या नजरेआड होत नसल्याने त्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. रेल्वे विभाग किंवा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे अद्याप दुर्लक्ष केल्याची टीकाही होत आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना फक्त चारचाकी वाहनांतून फिरणे नव्हे तर ज्या बाबी लक्षात येतील त्यावरही कारवाई करणे अपेक्षित असल्याचा सल्ला विविध स्तरांतून देण्यात येत आहे.

जर अशा प्रकारे स्पष्टपणे नियमभंग होत असेल तर निवडणूक अधिकारी त्यावर किती लवकर आणि कडक पाऊल उचलतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने नियमांचे पालन झालेच पाहिजे अशी मागणी आता सर्वत्र होत असून या प्रकरणातील निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन? वंचित बहुजन आघाडीची सीवीजिल वरून तक्रार Loksabha Election 2024

अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर एका राजकीय पक्षाच्या वतीने स्टेज उभारण्याचे काम सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या कृतीला निवडणूक आचारसंहितेचा भंग म्हणून आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजिल अॅपवर याबाबत तक्रारही दाखल केली आहे.

अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर रविवारपासून एका राजकीय पक्षाच्या वतीने मोठा स्टेज उभारण्याचे काम सुरू आहे. हे रस्ता महत्वाचा असल्याने या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ही कृती निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करते अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Loksabha Election 2024

रविवारी दुपारपासूनच स्टेज उभारण्याचे काम सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजिल अॅपवरून तक्रार दाखल करून निवडणूक नियमभंगाची बाब मांडली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग आता कोणती कारवाई करेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. निवडणूक आयोगाकडून अशा गंभीर बाबींवर कठोर कारवाईंची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यावर विनापरवानगी स्टेज उभारण्याच्या कृतीवर निवडणूक आयोगाची कारवाई काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!