WhatsApp


Akola News धक्कादायक घटना: आजीसोबत पराटी वेचण्यास गेलेल्या १२ वर्षीय नातवाचा विहिरीत पडून मृत्यू

Share

जीवनाचे किती छोटेसे धागे असतात हे समजते तेव्हा प्रत्येकजण स्तब्ध होतो. Akola News अकोला जिल्ह्यातील दहीहंडा परिसरात घडलेली एक घटना अगदी हृदयविदारक आहे. आजीसोबत कडबा विकण्यास गेलेल्या १२ वर्षीय नातवाची विहिरीत पडून झालेली दुर्दैवी मृत्यू ही घटना प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू आणते.

आजी आणि नातवाचे प्रेम हे अगदी निखळ प्रेम असते आईच्या पदरा खाली जरी मुलगा वाढत असला तरी त्यावर संस्कार मात्र आजीचे असतात हे काही नव्याने सांगायला नको आज मात्र आजीच्या डोळ्यादेखत आपला १२ वर्षाचा नातू आपल्याला कायमच सोडून गेल्याचं दुःख सहन करण्याची वेळ आली.

अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार जवळ असलेल्या धामना येथील उमेश कळसकर यांनी आई सकाळी पराटी वेचण्यास जात होती आजी शेतात जात असल्याचे पाहून तिचा नातू ओम उमेश कळसकर हा देखील आपल्या आजीच्या मागे येण्यासाठी लागला आजी व नातू दोघेही पराटी वेचण्यासाठी गेले उन्हाचा देखील पारा वाढला उन तापत असल्याने ओम यांच्या आजीला तहान लागली

पण जवळ असलेले पाणी संपल्याने समोरून विहिरीतून पाणी आणण्यासाठी १२ वर्षीय ओम हा गेला आणि तेथेच घात झाला अमोल याचा तोल गेल्याने अमोल हा खोल विहिरीत पडला आपला नातू विहिरीत पडल्याची बाब आजीच्या लक्षात येताच आजीने आरडा ओरडा केला तेव्हा गावातील काही धाडसी तरुणांनी पटापट विहिरी उड्या व ओमचा मृतदेह ची शोधाशोध घेणे चालू केले

 अर्धा तास अथक प्रयत्न नंतर ओम उमेश कळसकर या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे, हेड कॉन्स्टेबल भांडे कर्मचारी खांडवाये, होमगार्ड,आदी उपस्थित राहून पंचनामा करून सदर मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात हलविण्यात पाठविण्यात आला. आजी सोबत निघालेल्या नातवाची अखेची भेट ठरलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

1 thought on “Akola News धक्कादायक घटना: आजीसोबत पराटी वेचण्यास गेलेल्या १२ वर्षीय नातवाचा विहिरीत पडून मृत्यू”

Leave a Comment

error: Content is protected !!