WhatsApp


highway of death जिल्ह्यातील हा मार्ग बनला “मृत्युचा महामार्ग” पुन्हा एकदा रक्तबंबाळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात,एकाचा मृत्यू

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २३ मार्च संतोष माने प्रतिनिधी मूर्तिजापूर :- मूर्तिजापूर येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा नागरिकांसाठी आता “मृत्युचा महामार्ग” highway of death बनला आहे. या मार्गावरील अपघातांमुळे अनेक जण जिवाला मुकले आहेत. आज झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वारास प्राणापर्याय झाला.

highway of death
highway of death

होळीच्या पूर्वसंध्येलाच अनभोरा गावाजवळ हा दुर्घटनाग्रस्त अपघात घडला. मूर्तिजापूरहून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका रेनॉल्ट कंपनीच्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीचा चेंदामेंदा उडाला आणि दुचाकीस्वार देवरावजी सदार यांचा जागीच मृत्यू झाला.

highway of death
highway of death

एम एच ४९ बी आर ९३५२ क्रमांकाच्या रेनॉल्ड् कंपनीची कार भरधाव वेगाने जात जात असताना या कर ने समोरील एम एच ३० ऐस ७६९१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली धडक इतकी जबर होती की या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चेदमेंदा झाला तर कार मधील एअर बॅग उघडली आणि समोरील भाग भागाचा चुराडा झाला या अपघातात दुचाकी स्वार देवराव गुलाबरावजी सदार रा शेलुवेताळ तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही कार बोरगाव मंजूहून मृतदेहाच्या अंत्यविधीनंतर परतत असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला घटनेचा पंचनामा करून मृतदेह सईबाई मोटे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला अपघात घडल्या नंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी त्वरित वाहतूक सुरळीत करून कार व कार चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या या घटनेने अंनभोरा या गावात शोककळा पसरली आहे.

या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक भयभीत झाले असून मार्गाच्या सुरक्षितेतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा अपघातांपासून बचाव करण्यासाठी महामार्गावरील सुरक्षा उपायांची सख्त आवश्यकता आहे. तसेच वाहनचालकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!