विभागातील निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे अकोल्यात स्नेहसंमेलन; क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Photo of author
Views-
[WPPV-TOTAL-VIEWS]

अकोला, दि. २९ : सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दि. ३० व ३१ डिसेंबर रोजी अकोला येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातून सुमारे ८५० विद्यार्थी त्यात सहभागी होतील.

समाजकल्याण विभागाच्या नियंत्रणातील पाचही जिल्ह्यांतील शासकीय निवासी शाळा सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळांचा समावेश राहील. त्याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे.  

Leave a Comment