मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल व डिझेल झाले स्वस्त !

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक 14 मार्च 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून मिळाली आहे.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीय कुटुंबांचे कल्याण आणि सुविधा हेच त्यांचे नेहमीचे ध्येय आहे.”

नवीन किंमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर आता 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर असा आहे. मुंबईकरांना पेट्रोलसाठी 104.21 रुपये आणि डिझेलसाठी 94.41 रुपये प्रतिलिटर मोजावे लागतील. कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.94 रुपये प्रतिलिटर आहे.

या आधीच, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किंमतींमध्येही कपात करण्यात आली होती. अशा इंधन किंमतींमधील कपातींमुळे सरकारवरील अर्थसंकल्पीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!