WhatsApp


महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला पोलिसांचा मोठा उपक्रम; ३४ नवीन दामिनी मोटार सायकल्स लोकार्पित

(अकोला, ०७ मार्च २०२४): सामाजिक जाणिवा जागृतीसाठी, पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबवले जातात. जागतिक महिला दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षित वातावरणासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुषंगाने आज अकोला पोलीस लॉनमध्ये ३४ नवीन दामिनी मोटार सायकल्सचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी त्यांच्या उपस्थितीत नवीन दामिनी मोटार सायकल्सचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोटर सायकल रवाना केल्या

अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथके विस्तारित करण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी हा पुढाकार घेतला गेला आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि अन्य गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी अशा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

दामिनी पथकांमध्ये प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिलांना आपले अनुभव आणि तक्रारी मोकळेपणाने मांडता यावी यासाठी हा पुढाकार महत्त्वाचा आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात दामिनी पथकांच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी कृती सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!