अकोला न्युज डेक्स दिनांक ३० औक्टोबर :- राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला असून अकोल्यासह आसपासच्या परिसरात थंडीची लाट असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने वाढत्या थँडीत उबदार कपडे घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
अकोला शहराचे तापमान उतरल्याने चांगलाच गारठा जाणवू लागला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तीन दिवस शहरांचे तापमानात सातत्याने घट होतांना दिसत आहे. या घटत्या तपमानामुळे हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. दिवाळी संपताच हळूहळू थंडीचा प्रभाव जाणवू लागला असून, बाजारातही उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी लोटू लागली आहे. या वर्षी पावसाचा कालावधी अधिक काळ राहिल्यामुळे थंडीचे प्रमाण तुलनेत जास्त राहील, असा अंदाज आहे. उबदार कपडे विक्री करणाऱ्या मंडळींनी स्टॉल थाटले आहेत. स्वेटरची खरेदी दुकानात करण्याऐवजी उबदार कपडे अकोल्यातील भाटे क्लब येथील स्टॉल वर खरेदी करण्याकडे गेल्या काही वर्षांपासून लोकांचा कल आहे.