WhatsApp


जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचा प्रचार रथ, धुळवडीच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या नियमांची धुळवणूक?

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २५ मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचा प्रचार रथ उभा असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सरकारी मालमत्तेचा वापर प्रचाराअंतर्गत करण्यास मनाई केली आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचा प्रचार रथ उभा असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचा भाजपकडून खुलेआम भंग केला जात असल्याचे दिसून येत आहे.

अकोला न्यूज नेटवर्क चे पत्रकार अनुराग अभंग हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यां नंतर हे प्रकरण समोर आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह “विकसित भारत” असा प्रचार करणारा रथ उभा असल्याचे त्यांनी पाहिले. मात्रयाबाबत चौकशी केल्यानंतर तातडीने या रथावरील चित्र काढून टाकण्यात आला.

या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असतानाही निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आयोगावरून निष्पक्षतेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!