अनेक वेळा माकडांमुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. ते लोकांच्या सामानाची चोरी तर करतातच पण लहान मुलांनाही धोका निर्माण करतात. असाच काहीसा प्रकार एका तीन वर्षांच्या मुलीसोबत घडला. एका माकडाने मुलीला तिच्या आई-वडिलांसमोरूनच उचलून नेलं आहे. हे प्रकरण चीनच्या दक्षिण-पश्चिम गुइझोउ प्रांताचं आहे. मुलीचे आई-वडील शेतात काम करत असताना तेथे एक माकड आलं. तो तिला उचलून घेऊन गेला. मुलीचा बराच शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्याला शोधण्यासाठी कुटुंबीयांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर ही मुलगी पोलिसांना सापडली. मुलीला डोंगरावरून फेकून दिलं होतं. सुदैवाने तिला दुखापत झाली नाही. ती झुडपात पडली होती. मुलीचे वडील लियू यांनी सांगितलं की त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीला झाडाच्या सावलीत बसवलं होतं. त्याचं लक्ष काही सेकंदांसाठी दुसरीकडे गेलं आणि तोपर्यंत मुलगी तिथून बेपत्ता झाली.
लियू म्हणाले, ‘मुलीची आई लगेच रडू लागली आणि मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मी पोलिसांशी संपर्क साधला.’ यानंतर हे लोक जवळच्या गावात गेले. त्यांना एक व्हिडीओ सापडला ज्यामध्ये एक जंगली माकड तीन वर्षांच्या मुलीला घेऊन जाताना दिसत आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, त्याने घटनास्थळी एक मोठं माकड फिरताना पाहिलं आहे. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.
मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सापडली. तिला विचारण्यात आलं की माकडाने तिला पळवून नेलं आहे का? तर त्याने हो असं उत्तर दिलं. असं विचारल्यानंतर माकड कुठे गेलं? विचारलं. तेव्हा तिने डोंगराकडे बोट दाखवलं. मुलगी सुखरूप सापडल्याबद्दल पोलिसांचे आभारी असल्याचे लियू यांनी सांगितलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. मुलीची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.