अकोला न्युज डेक्स दिनांक ३० औक्टोबर :- मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनात राज्याच्या विविध भागांत सुरू झालेल्या लक्ष्याची जिल्हातही धग लागली आहे. रविवारी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गजानन हरणे यांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला
मराठा आरक्षणासाठी मनोज जरासे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाच्या हरणे समर्थनार्थ समाजसेवक तथा निर्भय बनो जन आंदोलनचे गजानन हरणे यांनी रविवार २९ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले. सोमवारपासून विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असून, शासनाने तातडीने आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही उपोषणकर्ते गजानन हरणे यांनी दिला आहे. यावेळी डॉ. प्रकाश गोड, संजय देशमुख, अजय शेळके, डॉ. अभय पाटील, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सुशांत बोर्डे, आकाश दद पणजी काकड, गजानन डिवरे पाटील, प्रफुल्ल देशमुख, विक्रांत चाहलोट, स्वराज थोटे, प्रदीप चोरे पाटील आदी मान्यवरांनी सत्याग्रह स्थळी भेट दिली.