अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो स्वप्निल सुरवाडे सह मंगेश चाऱ्हाटे कापशी दि. १० मार्च :- अकोला जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून या अपघातात जीव जाण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहेत सुसाट जाणारे वाहन धडक देऊन. जातात पण त्यात नाहक रस्त्यावरील नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो अशीच एक घटना आज दुपारच्या सुमारास अकोला कापशी रोड वर घडली अकोला ते पातूर रोडस्थित असलेल्या कापशी नजीक एका दुचाकीला अपघात झाल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वाशिमकडून पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कापशीजवळ आज दि.10/03/2024 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजताच्या दरम्यान दोन व्यक्ती आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. 30 एएल 3867 ने जात असताना अज्ञात वाहनाची धडक होऊन अपघात झाला असून सदर अपघातात दुचाकीस्वार आशिष सुरेश खंडारे (वय 24) व आदित्य राहुल खंडारे (वय 22) दोघेही रा.क्रांतीनगर, शिवणी,अकोला येथील असल्याचे निष्पन्न झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे साहेब,तारासिंग राठोड,शेख इस्माईल, श्रीकांत पातोंड,होमगार्ड देशमुख, होमगार्ड ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनाकरीता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.
कापशी रोड येथील उडान पुलाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले परंतु कापशी गावात जाण्यासाठी व कापशी गावापासून अकोला कडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने विरुद्ध साईडने वाहन चालकांना वाहन चालवावे लागते परिणामी असे अनेक वेळा अपघात झालेले आहेत तरी नॅशनल हायवे च्या वतीने हा कापशी गावाकडील ला सर्विस रोड कधी चालू होणार का असेच अनेक जणांचे बळी घेणार
अशा प्रश्न निर्माण झाला आहे