WhatsApp

होळी खेळतांना सावधान! प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ.गोंधने म्हणतात “ही” काळजी घ्याच! अन्यथा होऊ शकतो त्वचेचा कॅन्सर! कोणत्या रंगात कुठले रसायन हेसुद्धा सांगितले!

Share

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो २४ मार्च : उद्या,२५ मार्चला देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. रंग जरूर खेळा मात्र रंग खेळताना त्यापासून त्वचेला इजा होणार नाही याची काळजी असे आवाहन चिखली येथील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. गोंधने यांनी केले आहे. रसायन युक्त रंगाचा अतिरेकी वापर झाल्याचा त्वचेच्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागू शकते असा सावधतेचा इशाराच डॉ. गोंधने यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.



रसायनयुक्त लाल रंगामध्ये मर्क्युरी सल्फाईट असते, जे अतिविषारी असते त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. काळया रंगात ऑक्साईड असल्याने मुत्रसंस्थेचे कार्य बंद पडते. रसायनयुक्त हिरव्या रंगात असलेल्या कॉपर सल्फेटमुळे डोळ्याची एलर्जी, सुजणे व तात्पुरता आंधळेपणा येणे अशी लक्षणे जाणवू शकतात. चांदीसारख्या पांढऱ्या रंगातील ॲल्युमिनियम ब्रोमाइड मुळे कॅन्सर, तर निळ्या रंगातील प्रशियन मुळे त्वचेचे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचे डॉ.गोंधने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डॉ. गोंधने जाहिरात
डॉ. गोंधने जाहिरात

रंग खेळण्यापूर्वी “ही” काळजी घ्या…!

दरम्यान रंग खेळण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हेसुद्धा डॉ. गोंधने यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे. रंग खेळण्यापूर्वी अंगाला भरपूर प्रमाणात खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. नखांना नेल पॉलिश लावावी, डोळ्यांना चष्मा लावावा, रंगाने भिजलेल्या कपड्यात जास्त वेळ राहू नये, जखमांमध्ये रंग जाऊ देऊ नये अशी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. गोंधने यांनी केले आहे.

Watch Ad

असा बनवा नैसर्गिक रंग अन् धम्माल खेळा..!

दरम्यान रंगपंचमी उत्साहात साजरी करा मात्र नैसर्गिक रंग, कोरडे रंग वापरा असे डॉ. गोंधने यांनी म्हटले आहे. लाल जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा कुटलेला लगदा पाण्यात टाकून ढवळल्यावर चांगला आकर्षक लाल रंग तयार होतो. बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला असता नारंगी रंग तयार होतो. हिरवा रंग तयार करण्यासाठी गहू ,ज्वारी , पालक किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून लगदा पाण्यात टाकून उकळल्यावार आकर्षक हिरवा रंग तयार होतो. एक भाग हळद आणि दोन भाग कोणतेही पीठ याचे मिश्रण पाण्यात टाकून ढवळले असता आकर्षक पिवळा रंग तयार होतो. काळा रंग तयार करण्यासाठी आवळा फळाचा किस लोखंडी तव्यावर टाकून त्यात पाणी टाकून उकळल्यावर गडद काळा रंग तयार होतो. बीट च्या सालीपासून आकर्षक जांभळा रंग तयार होतो त्यामुळे रंगोत्सवाच्या रसिकांनी नैसर्गिक रंगानेच होळी खेळून आनंद साजरा करावा असेही डॉ.गोधने यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!