सावधान जिओची मुकेश अंबानी वाढदिवस ऑफर तुमचं बँक अकाउंट करू शकत रिकाम

परंतु, सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते हा सर्व दावा निव्वळ फसवणूक आहे. जिओ कंपनीकडून अशा प्रकारची कोणतीही मोफत ऑफर जाहीर करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे व्हायरल पोस्टमधील युआरएल लिंकही जिओच्या अधिकृत वेबसाइटची नसून ती एखाद्या अज्ञात व अविश्वासू वेबसाइटची आहे.

जिओच्या वेबसाइटची अधिकृत युआरएल ‘jio.com‘ असतानाही व्हायरल लिंकची युआरएल ‘kur.cat‘ अशी वेगळी आहे. त्यामुळेच ही लिंक काही फसवणूक करणाऱ्या वेबसाइटची असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनीही अशा अनोळखी लिंक्सवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे.

तरी जिओच्या नावाखालील या व्हायरल पोस्ट आणि अज्ञात लिंकवर विश्वास ठेवू नये असे सामान्य नागरिकांना सांगितले जात आहे. अशा प्रकारच्या फसव्या बातम्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!