व्यापारी वर्गत देखिल प्रचंड उत्साह व्यापारी – विक्रेत्यांचा डॉ. अभय पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २० एप्रिल :- अकोला लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचारात जनता भाजी बाजार परिसरातील फळ, भाजी व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी सामील होऊन त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महबूब खान उर्फ मब्बा यांच्या पुढाकाराने शनिवारी झालेला प्रचार दौरा
शनिवारी सकाळी माजी नगरसेवक महबूब खान उर्फ मब्बा यांच्या पुढाकाराने जनता भाजी बाजार परिसरात डॉ. अभय पाटील यांचा जोरदार प्रचार झाला. टॉवर चौकापासून प्रारंभ झालेल्या या प्रचारपथकात बाजारातील प्रत्येक व्यापारी, विक्रेता व उद्योजकांशी थेट संवाद साधला गेला. शेवटी हा प्रचारदौरा सय्यद उमर सय्यद बाला यांच्या आयोजित केलेल्या प्रचारसभेत समाप्त झाला.

डॉ. पाटील यांचे कौतुक व विजयासाठी आवाहन
जनता बाजाराच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यास डॉ. पाटील सक्षम असल्याचे प्रतिपादन करून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन मब्बा खान आणि हाजी सय्यद उमर यांनी केले. या प्रचार दौऱ्यात किरकोळ विक्रेता संस्थेचे अध्यक्ष तशवर पटेल यांनी संचालन तर हाजी अर्शद खान यांनी आभार मानले.

मोठ्या संख्येने सामील झाले पदाधिकारी व कार्यकर्ते
या प्रचार दौऱ्यात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक अमानकर, प्रदीप वखारिया, दिलीप खत्री आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तर चंद्रकांत सावजी, हाजी हमजा खान, इस्माईल खान आदी पक्षीय नेते उपस्थित होते. शिवाय मोठ्या प्रमाणात फळ व्यापारी, भाजी विक्रेते, किरकोळ विक्रेते, उद्योजक व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.

डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी जनता बाजारातील व्यापारी वर्गाने जोरदार पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कामगिरीचा विचार करता या निवडणुकीत त्यांच्या विजयाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एकत्र येऊन प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ नसून पुढील काळातही अशा रीतीने प्रचार केल्यास निश्चितच त्यांचा विजय संपादन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!