रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला, गेल्या सहा दिवसात तिसरी घटना!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दि. १२ मार्च :- मूर्तिजापूर येथे मंगळवार, दिनांक १२ रोजी सकाळी मूर्तिजापूर शहरातील रेल्वे 52 गेट जवळील रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा दिवसात रेल्वे अपघाताची ही तिसरी घटना आहे.

रेल प्रशासनाला एका व्यक्तीचा रेल्वेतून पडण्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि मृतदेह एलडीएच रुग्णालयात विसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला.

आ. हरीश पिंपळे यांच्या संचालनाखालील जय गजानन आपात्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, अमोल खंडारे, भूषण तिहीले आणि इंगोले यांच्या सहकार्याने मृतदेह उचलण्यात आला.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी अशा घटना टाळण्यासाठी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!