बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; आमदाराच्या घरावर दगडफेक

 बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजलगावमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केली आहे.

या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे माजलगावमध्ये तणावाचं वातावरण आहे.

आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. जोरदार घोषणाबाजी करत चारचाकी गाड्यांसह दहा दुचाकीही जाळण्यात आल्या आहेत. दुचाकींना आग लागल्यामुळे ऑफीसनेही पेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी बसवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहे. रविवारी देखील एका बसवर दगडफेक करण्यात आली आहे. आंदोलन शांततेच्या मार्गानं करा असं आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला करण्यात आलं आहे. मात्र आता काही ठिकाणी संयम सुटताना दिसत आहे. राजकीय पुढाऱ्यांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे, अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!