WhatsApp

दामिनी पथक ॲक्शन मोडवर – अकोला जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा नवा अध्याय

अकोला जिल्ह्यातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त अकोल शहरातच एक दामिनी पथक कार्यरत होता. मात्र पोलिस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून आता संपूर्ण जिल्ह्यात दामिनी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने 34 दुचाकी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

9 मार्च 2024 पासून अकोला जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनसाठी दामिनी पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकांची कार्यपद्धती अत्यंत व्यवस्थित आखण्यात आली आहे. दिवसभरात निश्चित वेळेत पेट्रोलिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली असून 9 ते 20 मार्च या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यातील दामिनी पथकांनी एकूण 89 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

शिवाय दामिनी पथकांनी जिल्ह्यातील एकूण 405 शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासोबतच 109 शाळा व महाविद्यालयांमध्ये महिला विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा, हेल्पलाइन क्रमांक यांची माहिती देण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात एकूण 23 पोलिस स्टेशन आहेत. त्यानुसार अकोला शहरातील 8 पोलिस स्टेशनांना प्रत्येकी 2 दुचाकी वाहने तर ग्रामीण भागातील 15 पोलिस स्टेशनांना प्रत्येकी 1 दुचाकी वाहन असे एकूण 31 वाहने दामिनी पथकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांद्वारे रोज सकाळी 7 ते 9, दुपारी 11 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत पेट्रोलिंग केली जाते.

पेट्रोलिंग दरम्यान दामिनी पथक सकाळी व संध्याकाळी आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये यांना भेटी देतात. शिवाय त्यांच्याकडून संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन QR कोड स्कॅन केले जातात. एखाद्या जोडप्याकडून (महिला व पुरुष) असभ्य वर्तन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कलम 110/117, 112/117 मपोका अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.

अल्पवयीन मुलांना आढळून आल्यास त्यांना समजावून सोडले जाते. जर कोणाही महिलेला त्रास होत असेल तर तिला पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 किंवा दामिनी हेल्पलाइन 7447410015 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकांची व्यापक उपस्थिती निर्माण करण्यात आली असून हा उपक्रम यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी असे पथक सर्वत्र उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!