WhatsApp

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्व जमातीच्या उत्थानासाठी-डॉ अभय पाटील

अकोला-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व जातीधर्माच्या कल्याणासाठी होते.म्हणून युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करून त्या दृष्टीने वाटचाल करण्याचे आवाहन अकोला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांनी केले. डॉ अभय पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनावर त्यांना विनम्र अभिवादन करीत उपस्थितांना डॉ आंबेडकर यांच्या जयंतीवर शुभेच्छा बहाल केल्यात.

डॉ अभय पाटील हे महानगर काँगेस कमिटीने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती दिनावर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले डॉ आंबेडकर हे केवळ राज्यघटनेचेच शिल्पकार नव्हते तर ते आधुनिक भारताच्या सामाजिक व्यवस्थेचे ही शिल्पकार ठरले आहेत. जाती जमातीत समता,बंधुत्व व न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य हे अनमोल असल्याचे सांगीत आपले विचार व्यक्त केले.दरम्यान सर्वप्रथम डॉ अभय पाटील यांनी अशोक वाटिका येथे उपस्थित होऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पण करीत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

या ठिकाणी महामानवांना अभिवादन केल्यावर त्यांनी विविध परिसरात आयोजित डॉ आंबेडकर जयंती सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवीत डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा बहाल केल्यात. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे,महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे,मनपा नेते साजिद खान पठाण, डॉ जीशन हुसेन, अब्दुल जब्बार,डॉ सुभाषचंद्र कोरपे ,माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर,महेंद्र गवई, चंद्रकांत सावजी, कपिल रावदेव, मोहम्मद इरफान, पुष्पाताई देशमुख, तशवर पटेल,प्रशांत प्रधान, एड सुरेश ढाकुलकर, जितेंद्र बगाटे,सचिन तिडके, राजीव नाईक, देविदास नेमाडे, हाजी शहा, सय्यद नाजीम, संजय देशमुख ,धीरज जिचकर ,दत्ता देशमुख, सय्यद सज्जू,रहमान बाबू, पद्माकर वासनिक,रबानी शहा,दिनेश खोब्रागडे, निलेश तोरणे ,विकास दिवेकर समवेत महाविकास आघाडीचे नेते ,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!