चिखलगाव येथील विहिरीत पडलेला मृतदेह पिंजरच्या आपत्कालीन पथकाने बाहेर काढला

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १४ मार्च: अकोल्यातील चिखलगाव येथे अनंत दयाराम तायडे (वय ४० वर्षे) हे सार्वजनिक विहिरीवर रंगकाम करत असताना विहिरीत पडून मृत्यूमुखी पडले. गावकऱ्यांकडून माहिती मिळताच पातुर ठाणेदार किशोर शेळके यांनी तात्काळ पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला घटनास्थळी पाठवले.

दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचाव कार्य सुरू केले. वीस फूट खोल पाणी आणि तीस फूट उंची असलेल्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. एका तासात गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पातुर ठाणेदार किशोर शेळके, दिलीप इंगळे, पो.काॅ. श्रीकांत पातोड, पो.काॅ. सत्यजित ठाकुर, पोलीस कर्मचारी, विजय तायडे, मा.पं.स. गजानन तायडे, मा.सरपंच, प्रणय तायडे, ग्रा.पं.स. संघपाल तायडे, विकास तायडे, श्रीकांत तायडे, दिनेश डोंगरे, चेतन वरठे, अनिकेत तायडे, दीपक तायडे, अक्षय गोपणारायन, राहूल तायडे, अश्विन तायडे आणि गावातील नागरिकांचा सहभाग होता.

Leave a Comment

error: Content is protected !!