WhatsApp

गरीबांच्या तांदळावर डल्ला मारणारी टोळी सक्रिय! प्रशासनाकडून दुर्लक्ष?

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक १३ मार्च अकोट: गरीब आणि गरजू लाभार्थ्यांसाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून गहू आणि तांदूळ दिले जातात. पण अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात एक टोळी सक्रिय झाली आहे जी लाभार्थ्यांकडून तांदूळ खरेदी करून रेशन माफियांना विकते. ही टोळी तांदूळ १४ ते १७ रुपये किलोग्रामप्रमाणे खरेदी करते, ज्यामुळे गरीब लोकांना मिळणारा मोफत तांदूळ त्यांच्याकडून हिसकावून घेतला जातो. हे काम पुरवठा विभागाचे असून या कडे मात्र सर्रास दुर्लक्ष केल्या जात आहे.

अनेक महिन्यांपासून सुरू असलेला गोरखधंदा:

या धक्कादायक प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अनेक महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असताना प्रशासनाला त्याची माहिती का नाही? ग्रामीण भागातील अनेक गावात हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसते.

रॅकेट आणि प्रशासनातील साटेलोटे:

तांदूळ विकणारे रॅकेट येथे सक्रिय असल्याचे बोलले जाते, परंतु त्यावर ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. कारवाई होण्याच्या आधीच रॅकेट आणि प्रशासनातील साटेलोटेबाजीमुळे जमा केलेला तांदूळ जिल्हा बाहेर पाठवला जातो. या रेशन घोटाळ्यात रेशन माफिया करोडो रुपये कमवत आहेत, तर गरीब जनता मात्र भुकी राहत आहे.

प्रशासनाची दिरंगाई आणि गरीबांचा त्रास:

प्रशासनाची दिरंगाई आणि रॅकेटला संरक्षण दिल्यामुळे गरीब लोकांचा त्रास वाढत आहे. गरीबांना मिळणारा मोफत तांदूळ हिसकावून घेतल्याने त्यांना आर्थिक नुकसान होते. तातडीने कारवाई करून रॅकेटला अटक करणे आणि गरीब लोकांना तांदूळ मिळण्यासाठी योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.10:37 AM

Leave a Comment

error: Content is protected !!