WhatsApp

अकोल्यात उड्डाण पुलावर टिप्पर आणि मालवाहू ॲपेची जबर धडक, टिप्पर चालक टिप्पर सोडून फरार

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १३ मार्च :- शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अग्रेसन चौक येथील उड्डाण पुलावर आज सहा वाजताच्या दरम्यान टिप्पर आणि मालवाहू ॲपे यांची जोरदार धडक झाली. या धडकेत मालवाहू ॲपेचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आणि ॲपेतील क्लिनर गंभीर जखमी झाला.

एमएच ३० बीडी ६६६६ क्रमांकाचा टिप्पर स्टेशन कडून अशोक वटिके कडे जात होता तर एमएच ३० बीडी २३७३ क्रमांकाचा टाईल्सचा माल घेऊन मालवाहू ॲपे अग्रेसन चौकाकडे येत होता. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत ॲपेतील क्लिनर, ४० वर्षीय अब्दुल रफिक, लक्कड गंज येथील रहिवासी, गंभीर जखमी झाला.

रामदास पेठ पोलीस आणि शहर वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अब्दुल रफिक यांना सरकारी दवाखान्यात भरती केले. व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली

प्राप्त माहितीनुसार, टिप्परचा चालक दारूच्या नशेत होता आणि अपघात घडल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. रामदास पेठ पोलिसांनी टिप्पर जप्त केला आहे आणि आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अकोल्यातील वाहुक विभाग पोलीस कर्मचारी शहरातील बेताल वाहतूक वठणीवर आणण्यासाठी आपल्या परिनी प्रयत्न करीत आहेत, शहरातील मुख्य ठिकाणी वाहतूक पोलीस सज्ज असून आपली ड्युटी चोख बजावत आहेत मात्र अकोल्यातील बेताल वाहतूक आणि नियम शून्य वाहन चालकांच्या हर्गर्जी पणा मुळे असल्या प्रकरचे अपघात घडत आहेत याला आवर घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे निदर्शनात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!