WhatsApp

अकोला शहरात डासांकडून अकोला म.न.प. चे ‘गुनगुन गाणं’ गाड झोपी गेलेले मनपा नारीकांच्या झोपेचे करत आहे खोबरे

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २९ मार्च :- अकोला शहरात एकीकडे वातावरणाचा बदल्यामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. अशातच शहरात डासांचा सुळसुळाट असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची भीती शहरात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनाविरोधात रोष वाढतच आहे. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ डास निर्मुलनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सद्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना अकोलेकरण मात्र डासांच्या व्यापाने ग्रासले गेले आहेत मार्च महिना सुरू झाला आणि सूर्यनारायण आग ओकू लागला त्यातच रात्री बे रात्री महावितरण मेहेरबान होते आणि लाईट जाते मग मात्र सुरू होते ती डासांची अंताक्षरी लाईट नाही त्यात गर्मीचा उकाडा याने आधीच त्रस्त झालेले अकोलकर आता डासांच्या त्रासाने देखील त्रस्त झाले आहेत.

स्वच्छ शहर सुंदर शहर पाहणारे सद्यस्थितीत अस्वच्छतेच्या वातावरणामुळे त्रस्त झाले आहेत. शहरातील बहुतांश ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच डासांचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना हा त्रास असह्य होत आहे. याविषयी नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. परंतु, अकोला महानगर पालिका प्रशासनाकडून डास निर्मुलनाच्या अनुषंगाने कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाही. त्या मुळे परिसरात डासांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

अकोला महानगर पालिकेत फवारणी यंत्र नुसते धूळखात पडले असून याचा उपयोग मला पहा अन बेलफुल वाहा असा झाला आहे. डासांचे प्रमाण इतके वाढले की, तुम्ही घरात बसा की बाहेर, डास चावल्याशिवाय राहत नाही. अकोला महानगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी मोजक्याच ठिकाणी स्वच्छता करतात त्या मुळेच डासांची प्रार्दुभाव वाढत आहे. यामागे नेमके काय कारण आहे. याचा शोध महानगर पालिका प्रशासनाने शोधावे. अन्यथा डासांच्या प्रकोपाने डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.

सर्वसाधारणपणे थंडीचा हंगाम संपल्यावर शहरात उष्णतेबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढतो. वेळीच त्यावर उपाययोजना व नियोजन न झाल्याने शहरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तब्बल वर्षभरा पासून शहरामध्ये कीटकनाशक फवारणी न झाल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गुनगुनणारे डास जणूकाही अकोला म.न.प.च्या कारभाराचे गुणगान गात असल्याचा भास होऊ लागला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!