अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ९ डिसेंबर २०२५:दहिहांडा परिसरातील नाकाबंदीत पोलिसांनी गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. गोपनीय माहितीवरून कारवाई करताना दोन जनावरे कोंबून घेऊन जात असलेला मालवाहू टाटा इंट्रा वाहन ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
हे प्रकरण 8 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 ते 2.10 या वेळेत घडले. HC 1887 नी अप नं. 379/25 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(क), 9, 9(अ) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 66(1) R/W 192(A) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. फीर्यादी म्हणून प्रमोद शेषराव दळवी, (ब नं. 1406, वय 28, पोस्टे दहिहांडा) यांनी तक्रार दिली.

कारवाईदरम्यान आरोपी अवेस खान सत्तार खान, वय 26, रा. टाटानगर, दर्यापुर (जि. अमरावती) हा दोन गोवंश जातीची जनावरे घेऊन जाताना आढळला. मुस्लीम स्मशानभूमी परिसरात नाकाबंदी केल्यावर वाहन थांबवण्यात आले. जनावरांच्या विक्री आणि मालकीबाबत विचारले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पंचासमक्ष घटनास्थळी पंचनामा करून जप्ती करण्यात आली.
जप्त केलेल्या मुद्देमालात एक लाल रंगाचा, अंदाजे दोन वर्षांच्या वयाचा गोरा (किंमत 18,000 रुपये), आणखी एक लाल-भुरकट रंगाचा अंदाजे तीन वर्षांचा गोरा (किंमत 20,000 रुपये) तसेच टाटा इंट्रा (MH 37 T 3283) ही वाहन अंदाजे पाच लाख रुपये किंमतीची असल्याचे नोंद आहे. एकूण मुद्देमालाची किंमत साधारण 5,38,000 रुपये अशी आहे.
पोलिसांनी आरोपीला थेट स्टेशनला आणून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.






