WhatsApp

वंचित बहुजन आघाडीचा पहिला डाव! नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवारांची जाहीर यादी – अकोल्यातील राजकारणात खळबळ

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १२ नोव्हेंबर २०२५:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना वंचित बहुजन आघाडीने आज नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हा स्तरावरील महत्त्वपूर्ण बैठकीत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.



बैठकीस जिल्हाध्यक्षांसह वरिष्ठ पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. पक्षाच्या या निर्णयानंतर अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांतही खळबळ उडाली आहे.

पक्षाकडून घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

क्रमांक नगरपरिषद / नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार

Watch Ad

1 बार्शिटाकळी नगरपंचायत अख्तर खान अलीमोद्दिन
2 मुर्तीजापूर नगरपरिषद शेख इम्रान शेख खलील
3 अकोट नगरपरिषद सौ. स्वाती मंगेश चिखले
4 तेल्हारा नगरपरिषद सौ. विद्याताई सिद्धार्थ श्यामस्कर

पक्षाच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषाचे प्रकार दिसून आले. आत या उमेदवारांसमोर निवडणुकीचं रणांगण सजलं असून, येत्या काही दिवसांत प्रचार मोहिमेला वेग येणार आहे.

स्थानिक मतदारांमध्ये या यादीची चर्चा जोरात आहे. काही ठिकाणी या नावांमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!