Finance Horoscope Today 8 October 2025 In Marathi : मेष, मिथुनसह या राशींसाठी दिवस फारसा चांगला नाही. वृषभसह या राशीच्या जातकांसाठी ऑफिसमध्ये उत्तम वातावरण असून कामाचे कौतुक होईल. या राशींसाठी प्रमोशनचा योग तर तूळसह या राशीचे काम वाढणार आहे त्यांनी सावध रहावे. तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते सविस्तरपणे पाहूया
मेष आर्थिक राशिभविष्य – कामात अनेक समस्या :- आज तुमच्या मनात जो विचार आहे, ते काम होणार नाही. जर तुम्ही कोठे वसुलीसाठी जात असाल तर ते काम सार्थकी लागेल. आज कोणाला कोणतेही वचन देऊ नका. तुम्ही एखाद्याची मदत करण्याची इच्छा बाळगाल पण त्याच्या मनात तुमचा फायदा घेण्याचा विचार असू शकतो. चांगले करण्याच्या विचारात तुम्ही तुमचे नुकसान कराल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य – ऑफिसमध्ये कामाचे कौतुक :- आज तुमच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यावर आज नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर खुष आहेत. ते तुमच्या कामाचे कौतुक करतील तसेच बोनसचा योग आहे. आज घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. एखादा चांगला ठोस सल्ला तुमच्या कामी येऊ शकते.
मिथुन आर्थिक राशिभविष्य – अडचणीचा सामना करणार :- आज एखादे जबाबदारीचे काम तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमध्ये जबाबदारी वाढणार आहे. कामात फोकस ठेवा तरच प्रोजेक्ट पूर्ण होणार. आज फिरताना एखादी प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल पण तुम्हाला तत्काळ त्यांना मदत करावी लागेल. काही अडचणी येतील पण तुम्ही स्वतःला कमकुवत समजणार नाही.
कर्क आर्थिक राशिभविष्य – प्रॅक्टीकल राहून निर्णय घ्या :- तुम्ही भावनेच्या भरात काही वेळा फार मोठी चूक करता. भविष्यात हेच काम तुमच्यासाठी अडचण बनू शकते. त्यामुळे प्रॅक्टीकल राहून निर्णय घ्या. तुम्ही इतरांबद्दल चांगला विचार करा आणि कार्य करा. व्यवसायात काम वाढत आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. क्रिएटीव्ह काम करण्याचा योग आहे.
सिंह आर्थिक राशिभविष्य – कामात फोकस महत्त्वाचा :- तुम्हाला तुमच्या चारी बाजूच्या वातावरणावर बारीक नजर ठेवावी लागेल. तुमच्या आजूबाजूला काय सुरू आहे, याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. तुमचे विरोधक किंवा व्यवसायातील स्पर्धक तुमच्या मागे हात धुवून लागले आहेत. तुम्ही हुशारीने काम करा. कामाचे नियोजन वेळेनुसार करा. जबाबदारी जास्त वाटत असेल तर टीम वाढविण्याची वरिष्ठांना विनंती करा.
कन्या आर्थिक राशिभविष्य – कामात सावध राहा :- नोकरी किंवा व्यवसायात काही फेरबदल करावे लागतील, ज्यांची मदत मिळेल त्यांना हाताशी घेऊन तुम्हाला काम अपडेट करा. काम वाढते आहे आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. धनलाभाचे योग आहेत. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत प्रेम व्यक्त करेल तसेच प्रस्ताव देखील ठेवेल तुम्ही संपूर्ण माहिती घेवून आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्या. तुमचा फायदा उठवण्याचा प्रयत्न आज होऊ शकतो.
तूळ आर्थिक राशिभविष्य – कठोर मेहनत तरच यश :- नोकरी- व्यवसायात काम वाढते आहे. तुम्हाला जास्तीचे काम करावे लागेल. काही सहकारी तुम्हाला मदत करतील. दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना त्यांना नीट समजून घ्या. जे काही काम करणार त्यात प्लॅनिंग योग्य प्रकारे करा. लवलाइफमध्ये जोडीदार काही सांगत असेल आणि तुम्हाला ते आवडत नसेल तर तुमचे मत स्पष्टपणे व्यक्त करा. कोणतीही गोष्ट अशी करु नका ज्यामुळे नातेसंबंध बिघडतील अथवा घरातील सदस्य नाराज होतील.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – कामात मदत घ्यावी लागेल. :- जर तुम्ही आज एखादी नोकरी शोधत असाल किंवा नवीन व्यापार करू इच्छित असाल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या. यातील एखादी व्यक्ती तुमची मदतनीस म्हणून सिद्ध होईल. तसेच तुम्हाला जसे काम जमते त्याप्रमाणे काम करत राहा. व्यवसायात सहकारी, कामगार यांच्यासाठी ट्रेनिंग कार्यक्रमाचा विचार तुम्ही करणार आहात.
धनू आर्थिक राशिभविष्य – घाईगडबड केली तर चूका जास्त :- आज तुमचे काम पूर्ण करण्यासाठी घाईगडबड करू नका. जर तुम्ही ढिलाई केली तर महत्त्वाच्या कामाला विलंब लागू शकतो. जी जबाबदारी तुम्हाला हवी आहे, ती दुसरी कोणी तरी मिळवून स्वतःचा स्वार्थ साधू शकते. त्यामुळे वेळ वाया न घालवता काम करावे. नियोजन आणि व्यवस्थापन यामुळेच नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल.
मकर आर्थिक राशिभविष्य – जुने संकल्प पूर्ण करणार :- आज जुने संकल्प पूर्ण करण्याचा दिवस आहे. एखादे काम लांबवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात त्यातून अडचणी निर्माण होतील आणि खर्च वाढेल. खर्च जास्त होत असेल तर त्याकडे लक्ष द्या. व्यवसायात काही मिटींग होतील त्यात तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. आज कामात जास्त मेहनत असून थकवा येण्याची शक्यता आहे. पण काळजी करु नका तुम्ही यशस्वी होणारच आहात.
कुंभ आर्थिक राशिभविष्य – ऑफिसमध्ये प्रमोशन होणार :- बऱ्याच दिवसांपासून दैनंदिन जीवनात बदल येईल. एखादे मोठे पद मिळत असेल तर ते स्वीकरण्यात वेळ लावू नका. तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. प्रमोशनसोबत जबाबदारी वाढते आहे पण तुम्ही सगळे काम व्यवस्थित पार पाडणार आहात. व्यवसायात नवीन ग्राहक मिळत आहेत त्यामुळे उत्पादनाच्या दर्जावर खास लक्ष द्या.
मीन आर्थिक राशिभविष्य दिखावूपणापासून दूर राहा :- तुम्ही अनावश्यक दिखावूपणापासून दूर राहा. तुम्ही जास्त शहाणे आहात असे जर तुम्ही केलेत तर काम होणार नाही शिवाय सगळेजण तुमच्यापासून दूर जातील. मोठ्या मुलासोबत वादाची शक्यता आहे. प्रवासात तब्येत सांभाळा कारण जास्त धावपळ त्रास देणार आहे. तुम्हाल नटूनथटून कोठे तरी जावे लागेल, किंवा एखाद्या समारंभासाठी तयार व्हावे लागेल.





